मैत्री चषकाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला भाई निळकंठ 11 संघ
विनायक पाटील
पेण : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बजरंग स्टार रामवाडी आयोजित मैत्री चषक 2024 क्रिकेट स्पर्धा मोठ्या धुमधडाक्यात संपन्न झाली असून भाई निळकंठ इलेव्हन या संघाने मैत्री चषकावर आपले नाव कोरले असून प्रथम क्रमांकचा मानकरी ठरला. या स्पर्धेचे आयोजन नेहमीप्रमाणेच पत्रकार विनायक पाटील यांनी केले असून ही क्रिकेट स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. लीग पद्धतीने खेळविण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पेण नगरपरिषदेचे हॅट्रिक नगरसेवक निवृत्ती भास्कर पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्यासह पत्रकार विनायक पाटील व क्रिकेट प्रेमी आणि खेळाडू उपस्थित होते.

रामवाडीमधील ताडाच्या झाडाजवळ मैदानावर खेळवण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये संजय कदम इलेव्हन, कल्पेश पाटील इलेव्हन, समीर माळी इलेव्हन, भाई निळकंठ इलेव्हन, उमेश सिंग इलेव्हन या पाच संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. मैत्री चषक 2024 क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात भाई नीलकंठ इलेव्हन व उमेश सिंग इलेव्हन या दोन संघांमध्ये अटीतटीची लढत होऊन भाई नीलकंठ इलेव्हन संघाने उमेश सिंग संघाला शेवटच्या षटकामध्ये सात धावा काढू न देता विजय प्राप्त करून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. तर द्वितीय क्रमांक उमेश सिंग संघाने पटकावले. दोन्ही संघांना मान्यवरांच्या हस्ते भव्य चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत मालिकावीराचा मानकरी ठरला अतुल वग्रे, उत्कृष्ट फलंदाज प्रथमेश पाटील तर उत्कृष्ट गोलंदाज आणि अंतिम सामन्याचा सामनावीर रुपेश पाटील आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अविष्कार कदम यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

या क्रिकेट स्पर्धेसाठी हॅट्रिक नगरसेवक निवृत्ती पाटील, युवा नेते विवेक जोशी, भाई निळकंठ म्हात्रे, दिलीप पाटील सर, अशोक ठाकूर, मनोज माने,मारुती पाटील, चंद्रहास म्हात्रे,मनोज पाटील,विजय पाटील, अमित पाटील आदींचं क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बजरंग स्टार रामवाडी, व रामवाडीचा राजा तसेच रामवाडीतील खेळाडूंनी मोलाचे सहकार्य केले.