• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगाव शहरात आफ्रिकन मुंबई सर्कसचे आगमन

ByEditor

Mar 12, 2024

विदेशी कलाकार करणार रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन

सलीम शेख
माणगाव :
संपूर्ण देशभरात गाजलेल्या व रसिक प्रेक्षकांचे मने जिंकलेल्या आफ्रिकन मुंबई सर्कसचे माणगाव शहरात प्रथमच नाणोरे फाटा येथे एचपी पेट्रोलपंप शेजारील भव्य मैदानात आगमन झाले आहे. या सर्कशीमध्ये विदेशी आफ्रिकन कलाकार हे वैशिष्ट्ये आहेत. त्यांनी देशभरात आपली कला कौशल्य दाखवून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले असून माणगावकरांनाही या सर्कशीचा आनंद लुटता येणार आहे.

माणगावात बऱ्याच वर्षानंतर सर्कस आली आहे. गेली ३० वर्षांपूर्वी माणगावात सातत्याने सर्कशीचे कार्यक्रम होत होते. बऱ्याच अवधी नंतर देशभरात गाजलेली आफ्रिकन मुंबई सर्कस प्रथमच माणगाव शहरात आली आहे. हि सर्कस माणगावात दि. ८ मार्च पासून सुरु झाली असून दररोज सायंकाळी ५ व रात्री ८ असे २ शो असून शनिवार व रविवार या २ दिवशी खास शो म्हणून दुपारी २ वा. तसेच सायंकाळी ५ व रात्री ८ वाजता असे ३ वेळा शो राहणार आहेत. या सर्कशित आफ्रिकन खेळ , आफ्रिकन जिमन्यास्टिक खेळ, वरचा झुला , मौत का कुवा , मोटारसायकल जंप, लहान मुलांसाठी जोकर, चिंपांजीसारखा दिसणारा माणूस असे विविध खेळ प्रयोग आहेत. २ तास हा सर्कशीच्या करमणुकीचा कार्यक्रम चालत असून माणगावकरांनी आपल्या दैनंदिन कामातून थोडासा विरंगुळा म्ह्णून या सर्कशीचा आनंद घ्यावा. या सर्कशीबाबत अधिक माहितीसाठी मो. नं. ९१६२८५००८६ व ९८३४४२५५६९ यावर संपर्क साधण्याचे आवाहन आफ्रिकन मुंबई सर्कस यांच्या प्रतिनिधींकडून करण्यात आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!