• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

दिघी पोर्टमध्ये महिलांनाही उत्तम रोजगार उपलब्ध होईल -आ. अनिकेत तटकरे

ByEditor

Mar 12, 2024

अदानी फाउंडेशन दिघी पोर्टच्या माध्यमातून घंटागाडीचे लोकार्पण

अभय पाटील
बोर्ली पंचतन :
अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड माध्यमातून ग्रुप ग्राम पंचायत दिघी ला घंटागाडी लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास आमदार अनिकेत तटकरे, दिघी पोर्ट लिमिटेड सीईओ कपिल कुमार खंडेलवाल, ग्रुप ग्रामपंचायत दिघी विपुल गोरीवले, उपसरपंच गोपाळ मेंदडकर, सुरक्षा प्रमुख चंदर देव संब्याल, गटविकास अधिकारी गजानन लेंडी, मच्छीमार सोसायटी अध्यक्ष लक्ष्मण मेंदाडकर, कोळी समाज अध्यक्ष किरण कांदेकर, ओली सुकी मच्छी समिती अध्यक्ष कलावती भूनेसर, बचत गटाच्या महिला आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रासताविकात जयश्री काळे यांनी अदानी फाउंडेशन मार्फत संचालित विविध ग्राम विकास कार्यक्रमा बद्दल माहिती दिली. सुबोध कुमार सिंह सीएसआर प्रमुख महाराष्ट्र यांनी ग्वाही दिली की अदानी फाउंडेशन ग्रामविकासासाठी कटिबध्द असुन अदानी समूहाचे संस्थापक असे विचार करतात की गावाचा विकास होणार तरच कंपनीचा विकास होणार.

कपिल कुमार खंडेलवाल सीईओ दिघी पोर्ट यांनी घंटागाडी लोकार्पण करतांना स्वच्छतेचे महत्व पटवुन दिले. गट विकास अधिकारी गजानन लेंडी यांनी अनिकेत तटकरे यांना कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागेची उपलब्धता करून देण्यात यावी अशी विनंती केली. अदानी फाउंडेशन विवीध उपक्रमातून गावाचा विकास सढळ हाताने करत आहेत. आमदार अनिकेत तटकरे यांनी अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड माध्यमातून घंटागाडी देण्यात आली त्याकरिता सर्वप्रथम आभार मानले. स्वच्छतेत लक्ष्मीचा निवास असतो. आपले गाव स्वच्छ ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. दिघी पोर्ट लिमिटेडचा व्यवसाय सुरू होणार तर निश्र्चितच रोजगार उपलब्ध होईल. आपणा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. महिलांना सुद्धा रोजगार संधी उपलब्ध होईल. सीएसआर माध्यमातुन शैक्षणिक विषयक, आरोग्यविषयक, पाणी संवर्धन करण्यासाठी विवीध उपक्रम उत्कृष्टरित्या राबविले जात आहे. कंपनी येत असताना व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध करून देतात. आपल्याला त्या संधीचे सोने करायचे आहे.

घंटागाडीचे सर्व कागदपत्र ग्रुप ग्रामपंचायत दिघीला सुपूर्द करण्यात आले. घंटागाडीचे लोकार्पण गावकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. महिलांनी आपल्या विविध मागण्या पुढे करत विकासाची ग्वाही देण्यात आली. अदानी फाउंडेशन निश्चितच आपल्याला नवे वळण देणार. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लक्ष्मण मेंडाडकर यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अदानी फाउंडेशनचे अवधूत पाटील, प्राजक्ता आदुलकर, सुप्रिया चव्हाण, प्रज्ञा कासारे आणि नम्रता दिघीकर यांनी अथक परिश्रम घेतले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!