घन:श्याम कडू
उरण : आज उरण येथे नरेंद्रचार्य महाराज यांच्या पादुकांचे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. नरेंद्रचार्य महाराज यांचे प्रवचन व गुरुपादुका पूजन आणि दर्शन सोहळा आज सकाळी उरण तालुक्यातील नवघर येथील कानकेश्वरी मैदानात आयोजित करण्यात आला होता. यावेळी पादुका व गुरुपूजन सोहळा, श्रींच्या पादुकांचे आगमन, सामाजिक उपक्रम, गुरुपूजन, आरती सोहळा, प्रवचन, उपासक दीक्षा, दर्शन आणि पुष्पवृष्टी करण्यात आली.

या कार्यक्रमास माजी आमदार मनोहरशेठ भोईर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, माजी सभापती महादेव बंडा, शेकाप पनवेल तालुका चिटणीस नारायणशेठ घरत, उरण तालुका चिटणीस विकास नाईक आदींनी पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी नरेंद्र महाराज यांचे भक्तगण हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.