• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आंबेवाडी येथील नदीत बुडून अनोळखी इसमाचा मृत्यू

ByEditor

Mar 13, 2024

विश्वास निकम
गोवे-कोलाड :
आंबेवाडी गावाच्या हद्दीतील कोलाड हायस्कूलच्या पुढे असणाऱ्या ब्रिजच्या खाली नदीच्या पाण्यात बुडून एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुधवार दि. १३ मार्च २०२४ रोजी सकाळी ८.०० वाजण्याच्या दरम्यान हा मृतदेह आढळून आला.

सदरची माहिती मिळताच कोलाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली. परंतु, मृत्यूचे कारण समजु शकले नाही. मयत इसमाची ओळख पटली नसुन सदर घटनेबाबत कोलाड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू रजि. नं. ४/२०२४ सीआरपीसी कलम १७४ नुसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असुन अधिक तपास कोलाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार पोसई चौधरी, पो. हवालदार गायकवाड करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!