विठ्ठल ममताबादे
उरण : गव्हाण ग्रुप ग्रामपंचायतकडून बेलपाडा गावाला सुमारे ९० हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर झाला आणि निधीसुद्धा प्राप्त झाला. दिनांक ३१.१०.२०२३ रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते जलकुंभाचा भूमिपूजन सोहळा पार पाडला. गावातील लोकांच्या मनात एक वेगळाच उत्साह भरला होता. पण ते आता सर्व हिरावून गेले आहे. आज ४ महिने उलटून गेले मात्र जलकुंभाचा अजून पायादेखील उभा राहिला नाही. शिवाय जलकुंभासाठी जे खड्डे खोदले गेलेत ते देखील आता जीवघेणे ठरत आहेत. जलकुंभ बांधण्यासाठी प्राथमिक शाळेच्या आणि अंगणवाडीच्या बाजूला जागा गृहीत धरून तिथे मोठा खड्डा खोदला आहे. त्या बाजूला लहान मुळे खेळत असतात आणि पावसाळ्यात त्यात पाणी भरणार आणि तो खड्डा त्या मुलांना तसेच इतर जनवारांसाठी देखील धोकादायक ठरणार आहे.

सुमारे ४ महिने उलटून गेले पण जलकुंभ काही अजून तयार होईल की नाही हीच मोठी शंका आता गावातील रहिवाशांनी उपस्थित केली आहे. त्यामुळे सदर जलकुंभ चोरीला गेला आहे हे बोलणेच उचित ठरेल.
