नागोठणे : मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे हायवे नाका येथील गॅरेजमध्ये काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली असून याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. हा सारा प्रकार ७ एप्रिल 2023 रोजी घडला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नागोठणे येथील २७ वर्षीय पीडित महिलेला कामाची गरज असल्याने तिने आपल्या मैत्रिणीकडे काम मिळेल का म्हणून विचारणा केली असता मैत्रिण फिर्यादीला मुंबई गोवा महामार्गावर मिरानगर नागोठणे येथील रहिवाशी असलेल्या आरोपीत याच्या गॅरेजमध्ये घेऊन गेली. तिथे त्या मैत्रिणीने आरोपीत आणि फिर्यादीची ओळख करून दिली आणि ती मैत्रीण तिथून निघून गेली.
मैत्रीण गेल्यानंतर एकटी असलेल्या फिर्यादी महिलेला आरोपीत याने गॅरेजच्या पाठीमागे बसण्यास सांगून तिच्या अंगाशी चाळे करू लागला. तिला धक्का मारून तिच्या कानाखाली मारून आरडाओरडा केलास तर ठार मारेन अशी धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर वारंवार पीडित महिलेचा पाठलाग करून तुझे फोटो व्हायरल करतो म्हणून धमकी दिली.
सदर प्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात नागोठणे पोस्टे गुरनं 0088/2023 भा. दं. वी. क. 376, 354, 354(a), 354(d), 323, 506 प्रमाणे गुन्ह्याची नोंद झाली असून पुढील तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एन. डी. चव्हाण हे करीत आहेत.