• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये होळी व धुळवड मोठ्या उत्साहात साजरी

ByEditor

Mar 25, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
तालुक्यात होळी व धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सुहासिनी महिलांनी आदल्या दिवशी रविवारी (दि. २४) होळी पौर्णिमेच्या दिवशी पुरणपोळीचे नैवेद्य दाखवून विधीवत होलिकेची पुजा करुन होलिकेचे म्हणजे वाईट विचारांचे दहन केले. सोमवारी (दि. २५) धुळवड सणानिमित्त बच्चे कंपनीने रंगाची उधळण केली. यावेळी आदिवासी बांधव, तरुण वर्ग, प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी वाद्यांच्या गजरात बेभान होवून धुळवड सणाचा आनंद लुटला.

होळीचा सण देशभरात पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात आदल्या दिवशी होळी पोर्णिमेला होलिका दहन केले जाते. पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. कोकणात तर होळीचा सण आठवडाभर साजरा केला जातो. होळीचा सण उत्तरेकडील राज्यात मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. भारतातच नाही तर परदेशातही होळीचा सण साजरा केला जातो. त्याचप्रमाणे उरणसारख्या खेड्यापाड्यातही मोठ्या उत्साहात होळीचा सण व धुळवड सण रंगाची उधळण करीत साजरी करण्यात आली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!