• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठण्यातील व्यापारी अमर भंडारे यांचा प्रामाणिकपणा

ByEditor

Mar 27, 2024

सापडलेले सोन्याचे कानातले पोलीस ठाण्यात केले जमा

प्रतिनिधी
नागोठणे :
एकीकडे पैसा, दागदागिन्यांसाठी सख्खे पण वैरी होत असल्याचं चित्र असताना मात्र नागोठणे शहरात माणुसकीचं दर्शन घडवणारी घटना घडली आहे. नागोठणे शहरातील छोटासा कटलरीचा व्यवसाय करणारे अमर अशोक भंडारे यांना सापडलेले सोन्याचे कानातले त्यांनी पोलीस स्टेशनला जमा केले आणि पोलिसांनी ते सोन्याचे कानातले मूळ मालकाला परत केले आहेत.

याबाबत माहिती अशी की, नागोठणे शहरातील छोटे व्यापारी अमर अशोक भंडारे रा. गवळ आळी नागोठणे हे संतोष जैन यांचे दुकानाबाहेर कटलरीचे दुकान चालवतात. त्यांना त्यांचे दुकानांमध्ये खरेदी करिता आलेल्या मुलीचे सोन्याचे कानातील जोड मिळून आले. सोन्याचे कानातील जोड हे अमर भंडारी यांनी पोलीस स्टेशनमध्ये प्रामाणिकपणे जमा केले होते. मंगळवारी हे सोन्याचे कानातील जोड असलेली मुलगी मनिषा गुप्ता हिचा भाऊ आकाश गुप्ता हा पोलीस ठाण्यात आल्याने सदर कानातील जोड हे अमर भंडारे यांचे हस्ते पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हरेश काळसेकर यांच्या उपस्थितीत त्यांना परत देण्यात आले. अमर भंडारे यांनी एक सुज्ञ नागरिकाची भूमिका पार पाडत असताना कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. अमर भंडारे यांचे नागोठणे पोलीस स्टेशनच्यावतीने तसेच नागोठणे शहरातून विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!