अनंत नारंगीकर
उरण : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने उरण शहरातील काही प्रभागातील स्वच्छतेकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी उरण नगर परिषदेला वेळच मिळत नाही. त्यामुळे उरण शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून स्वच्छतेचे वाभाडे निघाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासीयांना स्वच्छतेचा संदेश दिला आहे. मात्र, देशात लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला लागल्याने सध्या शासकीय कार्यालयातील अधिकारी वर्ग कामाला लागले आहेत. त्यामुळे जनहिताची अनेक कामे रेंगाळत पडत आहे. त्यातच मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण नगरपरिषदेने शहरातील काही प्रभागातील स्वच्छतेकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी वर्गाला सध्या वेळच मिळत नाही . त्यामुळे शहरातील काही प्रभागात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.