• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माजी राज्यमंत्री, शेकाप नेत्या मीनाक्षी पाटील यांचे निधन

ByEditor

Mar 29, 2024

अमूलकुमार जैन
अलिबाग :
महाराष्ट्र राज्याच्या माजी राज्यमंत्री, शेकाप नेत्या मीनाक्षी पाटील यांचे वयाच्या 76व्या वर्षी निधन झाले.

मीनाक्षी पाटील यांचा जन्म 1947 साली झाला होता. मीनाक्षी पाटील या 1995 ते 1999, 1999 ते 2004 आणि 2009 ते 2014 पर्यंत अलिबाग विधान सभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत असताना त्यांनी काही काळ महाराष्ट्र राज्याच्या मत्स्यमंत्री विभागाच्या राज्यमंत्री म्हणून कारभार पाहिला आहे. मीनाक्षी पाटील या माजी विरोधी पक्षनेते तथा ज्येष्ठ विधिज्ञ दत्ता पाटिल यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या कन्या होत्या. शेकापचे आ. जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांच्या त्या भगिनी होत. तर शेकाप नेते आस्वाद पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

रायगडची झुंजार रणरागिणी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्यावर आज दुपारी २ वाजता पेझारी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मीनाक्षी पाटील यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून शोक प्रकट केला जात आहे. एक अभ्यासू नेत्या अशी त्यांची ख्याती होती.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!