• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बँकेच्या सुरक्षारक्षकाला मारहाण; गुन्हा दाखल

ByEditor

Mar 29, 2024

सलीम शेख
माणगाव :
तालुक्यातील एचडीएफसी बँक शाखा मोर्बा येथील सुरक्षारक्षकाला मारहाण केल्या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना दि. २८ मार्च २०२४ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बँकेच्या समोर मोर्बा येथे घडली. याबाबतची फिर्याद शुभम नागेश दाभेकर (वय २४, रा. कुमशेत ता. माणगाव) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.

सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील आरोपी गणेश तुकाराम पवार (वय २७, रा. शिरवली आदिवासीवाडी ता. माणगाव) याने दि. २७ मार्च २०२४ रोजी रात्री ११ ते दि. २८ मार्च २०२४ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एचडीएफसी बँकेचे सुरक्षारक्षक शुभम नागेश दाभेकर हा सेवेत असताना त्यांना आरोपी गणेश तुकाराम पवार हा दारू पिऊन येऊन त्या ठिकाणी झोपलेला मिळून आला. याबाबत गार्डने बँक मॅनेजर सतपाळसिंग जावरा यांना आरोपी याचे नाव सांगितले. या गोष्टीचा मनात राग धरून आरोपी याने फिर्यादी यांना शिवीगाळी, दमदाटी करून हाताबुक्याने मारहाण करून तेथे बाजूला पडलेल्या दगडाने फिर्यादी यांच्या डोक्यात मारून दुखापत केली. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ. गु. रजि. नं. ८६/ २०२४ भादंवि कलम३२४, ३२३,५०४,५०६ अन्वये दाखल करण्यात आली आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत भोजकर हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!