• Sun. Jun 29th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण शहरातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश

ByEditor

Jun 29, 2023

वैशाली कडू
उरण :
आषाढी एकादशी व बकरी ईद या पवित्र सणांच्या शुभमुहूर्तावर उरण शहरातील प्रमुख कार्यकर्ते फतेखान सोंडे, फवझन मंसूरी, सलमान मंसूरी, हसीन अन्सारी व अलम अन्सारी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी सर्वांना भगवी शाल अर्पण करून शिवसेनेमध्ये स्वागत केले.

यावेळी उरण शहरप्रमुख विनोद म्हात्रे, अल्पसंख्यांक सेलचे विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम, उप तालुकाप्रमुख कमलाकर पाटील, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, माजी नगरसेवक निलेश भोईर, ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुका अध्यक्ष धीरज बुंदे, शाखाप्रमुख कपिल फसाटे, अराफत मुजावर, मोहम्मद शेख, विवेक देशमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!