• Sun. Jun 29th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सेवापूर्तीनिमित्त सुप्रिया क्षीरसागर यांचा विशेष सन्मान

ByEditor

Jun 29, 2023

केशव म्हस्के
खारी-रोहा :
उपक्रमशिल व आदर्श शिक्षिका सुप्रिया क्षीरसागर या नुकत्याच शिक्षकी सेवेतून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीप्रित्यर्थ संस्था व विद्यालयाचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे.

रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेच्या श्री. रा. ग. पोटफोडे (मास्तर) विद्यालय खांब येथे प्रदीर्घ काळ सेवा करून सुप्रिया क्षीरसागर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे आपले सेवाव्रत चालविले. त्यांच्याप्रती कृतार्थ होऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीप्रत्यर्थ संस्था व विद्यालयाचे वतीने एका शानदार कार्यक्रमाचे आयोजन करून मोठ्या सन्मानाने त्यांचा सहपरिवाराह यथोचित सन्मान करण्यात येऊन पुढील भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी चेअरमन महेंद्र पोटफोडे, सचिव धोंडू कचरे, शंकर म्हसकर, भाई पोटफोडे, प्रकाश थिटे, धनाजी लोखंडे, गजानन भोईर, बाळाराम धामणसे, मारूती खांडेकर, नरेंद्र जाधव, नितिन जाधव, रामदास म्हसकर, अभिजित वरखले, सुनील म्हसकर, गणेश म्हसकर, सरपंच नेहा म्हसकर, नामदेव लहाने, सागर मोरे, राम शेलार, श्री. व सौ. वीरकर, तीनही शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश जंगम यांनी केले तर सुत्रसंचलन महेंद्र तुपकर व आभार चंद्रकला वरखले यांनी व्यक्त केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!