• Sun. Jun 29th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगाव कृषी विभागामार्फत कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन

ByEditor

Jun 29, 2023

विश्वास गायकवाड
बोरघर/माणगाव :
महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय माणगाव यांचे मार्फत अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन दिनांक २५ जून ते १ जुलै २०२३ या दरम्यान करण्यात आले आहे. यावेळी तालुका कृषी अधिकारी माणगाव अजय वगरे यांनी माहिती देताना सांगितले की, या कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत तालुक्यामध्ये प्रत्येक दिवशी गावागावांमध्ये कृषी विषयक कार्यक्रम राबविले जातात आहेत. यामध्ये आधुनिक पद्धतीने भात लागवड , तंत्रज्ञान प्रसार करणे, महिला किसान सन्मान, पोषण आहाराचे महत्व, कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, जमीन सुपीकता बाबत मार्गदर्शन, किसान सन्मान निधी योजना आदींबाबत मार्गदर्शन केले जात आहे.

या कृषी संजीवनी सप्ताहमध्ये तालुक्यातील कोस्ते खु. वडाचीवाडी, वावेदिवाळी, रातवड , वारक आदिवासी वाडी, निळज आदिवासी वाडी, गांगवली आदी गावांमध्ये मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी कोस्ते खु. येथील प्रकाश कदम यांचे प्रक्षेत्रावर भेट देऊन तालुका कृषी अधिकारी अजय वगरे यांनी एस.आर.टी. पद्धतीने भात लागवड व त्याचे व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले व इतर शेतकऱ्यांना एस.आर.टी. तंत्रज्ञानचा अवलंब कसे करावे हे प्रत्यक्ष दाखविण्यात आले. कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमाची सांगता दिनांक १ जुलै स्व. वसंतराव नाईक यांचे जन्मदिनी कृषि दिन साजरा करून करण्यात येणार आहे.
सदर कृषी दिनाचे आयोजन पंचायत समिती माणगाव व तालुका कृषी अधिकारी माणगाव यांचे संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृहामध्ये नियोजन केले आहे, तरी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी , शेतकरी गट , आदिवासी बांधव यांनी दिनांक १ जुलै कृषी दिन कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यालय माणगाव यांच्याकडून करण्यात येत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!