विश्वास निकम
कोलाड : आंबेवाडी येथील तरुण जयेश जयराम परबळकर (वय ३१) याचा सोमवार, दि. १/४/२०२४ रोजी दुपार १२.३० वाजण्याच्या सुमारास मौजे पुई गावाच्या कालव्याच्या वाहत्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोलाड पोलिस ठाण्यातुन मिळालेल्या माहितीनुसार वरील तारखेस व वेळी वरील ठिकाणी मयत याने फिर्यादी यांना सांगितले की, मी संभे येथे क्रिकेट बघण्यासाठी जातो असे सांगून गेला तो सकाळपर्यंत घरी आला नसल्याने त्याला शोधत असताना मयत जयेश याची स्कुटी क्र. एमएच ०६ सीई २८४७ ही पुई गावाच्या हद्दीत कॅनलच्या बाजूला मिळून आली. जयेश याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह कालव्याच्या पाण्यात मिळून आल्याने याची नोंद अ. मृ. रजि. नं.०६/२०२४ सीआरपीस कलम १७४ प्रमाणे कोलाड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून याचा अधिक तपास कोलाड पोलीस ठाण्याचे पोसई चौधरी व पोह गायकवाड करीत आहेत.