• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सुनील तटकरे यांना निवडून आणण्याचा भाजपच्या जुन्या जाणत्या निष्ठावंतांनी केला निर्धार

ByEditor

Apr 6, 2024

भाजप रायगड जिल्हा कमिटी सदस्य मोहन पाटील यांच्या घरी घेतली बैठक

विनायक पाटील
पेण :
रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे यांची घोषणा झाल्यानंतर त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या जुन्या जाणत्या निष्ठावान कार्यकर्त्यांची बैठक भाजप रायगड जिल्हा कमिटीचे सदस्य मोहन पाटील यांच्या घरी पार पडली. या बैठकीत पेण तालुक्यातील 40 ते 45 भाजपाचे जुने जाणते कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर बैठकीत जिते, हमरापुर, वाशी, झोतिरपाडा, पाबळ तसेच पेण नगरपालिका हद्दीतील एकूण 210 पोलिंग बुथवर प्रत्यक्ष जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ सबका विकास,सबका विश्वास’ या अनुषंगाने देशातील गरीब जनतेसाठी केलेल्या विकास कामांचा प्रचार व प्रसार प्रत्येक बुथवर जाऊन छोट्या मोठ्या सभांद्वारे जनतेसमोर मांडण्यात येणार असल्याने याचा फायदा सुनील तटकरे यांना पेण तालुक्यातून प्रचंड बहुमतांनी लीड देण्यासाठी होणार आहे. त्यासाठी पेण तालुक्यातील सर्व जुने जानते निष्ठावंत कार्यकर्ते कामाला लागल्याचे मोहन पाटील यांनी सांगितले. या बुथवाईज प्रचाराचा फायदा भविष्यात येणाऱ्या विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी होणार आहे. तसेच सुनील तटकरे यांना मत म्हणजेच मोदींना मत हा कार्यक्रम दाखवण्यात येईल या लोकसभा निवडणुकी देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदी यांचे आपकी बार 400 पार हे स्वप्न साकार होण्याच्या दृष्टीने रायगडचे उमेदवार सुनील तटकरे यांना प्रचंड मतांनी निवडून आणणेबाबत प्रत्येक जुने जानते निष्ठावान आजी-माजी भाजप पदाधिकाऱ्यांनी आपले अनुभव व रणनीती मांडली.

यावेळी मोहन पाटील – सदस्य, रायगड जिल्हा भाजपा कमिटी, वासुदेव पाटील, हिरामण कोकाटे, पिकू कावतकर, आनंद जाधव, मिलिंद भोईर, प्रणित म्हात्रे, जनार्दन नाईक, विकेश पाटील,युवक आघाडीचे माजी सरचिटणीस कुणाल पाटील, एम. डी. पाटील, गणेश आंबेकर, संजय पाटील, नाशिकेत मोकल, किशोर पाटील, प्रकाश वखरे, रमेश म्हात्रे, गणेश म्हात्रे, रुपेश ठाकूर, संतोष महाडिक, चेतन तांडेल, मनोज पाटील, परशुराम नाईक, हरिभाऊ पाटील, ज्ञानेश्वर जोशी, सतीश जोशी, सुरेश म्हात्रे, राजू कोळी आदी बैठकीला उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!