• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

धाटावमध्ये तरुणाला मारहाण, शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी

ByEditor

Apr 10, 2024

विटा, दगडांचा वापर करून फिर्यादीस केले रक्तबंबाळ

प्रतिनिधी
रोहा :
तालुक्यातील धाटाव गावात गुढीपाडव्यानिमित्त मराठी नवीन वर्षाची सुरुवातच गावातील तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी देत झाली. या प्रकारात विटा, दगडांचा वापर करून त्या तरुणाला डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने अक्षरशः रक्तबंबाळ केले असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकारामुळे धाटावमधील वातावरण भीतीदायक झाले असल्याचे पहावयास मिळाले.

रोहा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धाटाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ मंगळवार, दि. ९ एप्रिल रोजी रात्री ९.४५ वाजता फिर्यादी दीपक दगडू पवार (३६) रा. धाटाव याला मागील भांडणांचा मनात राग धरून आरोपी निलेश भोकटे, अजय मोरे, राहुल रटाटे, सागर प्रफुल जाधव, विकी संतोष खैरे, पीयुष अंबिस्ते यांनी मंदिराजवळ पडलेल्या विटा, दगड हातात घेऊन फिर्यादीला मारून त्याचप्रमाणे लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दिनेश रटाटे व मोन्या जाधव यांनी (सर्वजण रा. धाटाव) फिर्यादी यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली.

या घटनेबाबत रोहा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १००/२०२४ भा.द.वी.कलम ३२४,३२३,१४३,१४७,१४९,५०४,५०६ अन्वये गुन्ह्याची नोंद रात्री उशिरा करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा रोहा पोलीस निरीक्षक डी. बी. मूपडे यांच्या मार्गर्शनाखाली अशितोष म्हात्रे यांसह सहकारी अधिक तपास करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!