प्रतिनिधी
सोगाव : अलिबाग तालुक्यातील झालखंड येथील साई झालखंड संघाने चोरोंडे क्रिकेट मैदानावर दि. ४ ते ७ एप्रिल असे चार दिवसीय भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या क्रिकेट स्पर्धेत एकूण ४० संघांनी सहभाग घेतला होता.
अंतिम सामना शिवसाई मापगाव संघ व कपाळेश्वर कावाडे संघात होऊन शिवसाई मापगाव संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला तर कपाळेश्वर कावाडे संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. तृतीय क्रमांक साई झालखंड संघाने, चतुर्थ क्रमांक सातघर संघाने पटकावला तर पाचवा क्रमांक वाघेश्वर वाघ्रण संघाने पटकावला. यावेळी स्पर्धेचा मालिकावीर म्हणून वाघेश्र्वर वाघ्रण संघाचा निखिल पाटील याला घोषित करण्यात आले. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून शिवसाई मापगांव संघाचा प्रसाद राऊत याचा गौरव करण्यात आला, तसेच उत्कृष्ट फलंदाज म्हणून साई झालखंड संघाचा अक्षय कदम याला सन्मानित करण्यात आले आणि स्पर्धेचा सिक्सर किंग म्हणून साई झालखंड संघाचा अक्षय कदम याला गौरविण्यात आले. यासोबतच स्पर्धेचा चौकार किंग म्हणून कपाळेश्र्वर कावाडे संघाचा अक्षय म्हात्रे याचा गौरव करण्यात आला.
या सर्व विजेत्या संघांना व खेळात उत्कृष्ट कसब दाखविणाऱ्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते रोख रकमेचे पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत समालोचन यासीन मर्चंट, कपिल पाटील, निखिल पडते, इमरान बुखारी यांनी उत्कृष्टरीत्या करत खेळाडूंची व क्रिकेट रसिकांची मने जिंकली. स्पर्धा काळात कोणताही वादविवाद न होता अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या.