• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये मोबाईल मेडिकल युनिट सूरु

ByEditor

Apr 10, 2024

विठ्ठल ममताबादे
उरण :
दि. १०/०४/२०२४ रोजी उरण येथे पीएम-जनमन अंतर्गत दुर्गम व अतिदुर्गम भागांमध्ये मोबाईल मेडीकल युनिटची सुरुवात पंचायत समिती उरण येथे समीर वठारकर (गटविकास अधिकारी पंचायत समिती उरण), डॉ. बाबासो काळेल (वैदयकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय उरण) यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. याप्रसंगी डॉ. राजेंद्र गुंडाप्पा ईटकरे (तालुका आरोग्य अधिकारी उरण), किशोर उमते (विस्तार अधिकारी आयसीडीएस उरण), विनोद मिंडे (विस्तार अधिकारी ग्रामपंचायत), संतोष परदेशी (तालुका आरोग्य सहाय्यक उरण), मोबाईल मेडिकल युनिटचे सर्व सदस्य, मुनिल म्हात्रे, निशांत पाटील, गणेश आग्रावकर व पंचायत समितीमधील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

मोबाईल मेडिकल युनिट अंतर्गत वैद्यकीय चमुद्वारे आदिवासी गावातील सर्व नागरिकांची तपासणी तसेच त्यांना शासनाच्या आरोग्यविषयक योजनांची माहिती देणे व मदत करणेबाबत नियोजीत असल्यामुळे तालुक्यातील अदिवासी लोकांना घरपोच आरोग्य सेवा मिळणार आहेत. तरी तालुक्यातील गावकरी यांनी या टिमला सहकार्य करुन वैद्यकीय सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन उरण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र गुंडाप्पा ईटकरे यांनी केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!