• Sat. Jun 28th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नवघर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र डॉक्टर व परिचारिकांच्या प्रतिक्षेत!

ByEditor

Apr 13, 2024

जिल्हा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

अनंत नारंगीकर
उरण :
रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या उदासीन धोरणामुळे मागील वर्षापासून नवघर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे डॉक्टर व परिचारिकांच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील खेडेगावातील रुग्णांना आपला वेळ, पैसा वाया घालवून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे.

रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन सदस्य विजय भोईर यांनी आपल्या नवघर या जिल्हा परिषदेच्या मतदार संघातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून सुमारे ४८ लाख रुपये खर्च करून नवघर ग्रामपंचायत हद्दीत २०२२-२३ या वर्षात प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची उभारणी केली. मात्र, या उपकेंद्रात रिक्त असलेली समुपदेशन अधिकारी (सीएचओ),एएनएम (परिचारिका) पदे मागील वर्षापासून भरली गेली नाहीत. त्यामुळे एक आरोग्य सेवकच नवघर, पागोटे, भेंडखळ, बोकडविरा, फुंडे, नवीन शेवा, डोंगरी, पाणजे सह इतर ग्रामपंचायत हद्दीतील एकूण १० गावातील २१ हजार ४६९ लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. तरी शासनाच्या निकषांवर आधारित आवश्यक असलेली डॉक्टर, समूपदेशन अधिकारी (सीएचओ), एएनएम (परिचारिका) आणि आरोग्य सेवक यांची रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी नवघर गावातील सामाजिक कार्यकर्ते नरेश भोईर यांनी केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!