मिलिंद माने
महाड : अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवून व तिला लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस गरोदर ठेवल्याची घटना महाडमध्ये घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाड शहरातील वैभव भूपेंद्र पवार (रा. भगवंत अपार्टमेंट काकरतळे) या व्यक्तीने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. महाड शहरातील आरोपी वैभव भूपेंद्र पवार याने सदर अल्पवयीन मुलीस पोलादपूर येथे एका खाजगी लॉजवर नेऊन थंडपेयामध्ये मद्य मिसळून सदरच्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केला व कोणतीही वाच्यता करू नये म्हणून फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. सदरील अल्पवयीन मुलगी ही 28 आठवड्याची गरोदर असून याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात आरोपी वैभव उपेंद्र पवार यांच्या विरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम 376 (2) एन, 376 (2) एफ, 328,506 सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम ४/६ नुसार गुन्हा दाखल केला असून महाड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. खाडे पुढील तपास करीत आहेत.