मिलिंद माने
महाड : महाड शहरानजीक असलेल्या किंजळघर गावातील एका महिलेने सतत्याच्या आजारपणाला कंटाळून महाड शहराला जोडणाऱ्या दादली पुलावरून सावित्री नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली आहे.
महाड शहर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि राजेश महिपत कदम रा.किंजळघर यांच्या फिर्यादी नुसार वासंती अनंत केसरकर (५० रा. किंजळघर) या मयत महिला यांना गेली चार वर्षापासून मानसिक त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्यावर ठाणे येथे रुग्णालयात उपचार सुरू होते. आजार बरा होत नसल्याने याला कंटाळून सोमवारी त्यांनी महाड शेजारी असलेल्या दादली पुलावरून सावित्री नदीत उडीमारुन आत्महत्या केली. या घटनेची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
