घन:श्याम कडू
उरण : लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे २२ एप्रिलला तर महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे पाटील हे २३ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते.
मावळ लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आज गुरुवार, दि. १८ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. मावळ मतदारसंघात महायुती विरोधात आघाडी अशी सरळ लढत होणार आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे सोमवार, दि. २२ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे मंगळवार, दि. २३ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते. उमेदवारी अर्ज दाखल करताना दोन्ही उमेदवार शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
उमेदवारी अर्ज दि. १८ ते २५ एप्रिलपर्यंत दाखल करण्याची मुदत आहे. उमेदवारी अर्जाची छाननी दि. २६ एप्रिल रोजी तर दि. २९ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. मतदान दि. १३ मे रोजी होणार आहे.
