प्रतिनिधी
पोयनाड : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त पोयनाड येथे भव्य लुंबिनी बुद्धविहाराचे उत्साहात अनावरण व लोकार्पण करणयात आले.
भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सुबक मूर्तींची स्थापना बुद्धविहारामध्ये करण्यासाठी पोयनाड नाक्यापासून रथामध्ये वाजत- गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. बौद्ध भिक्खूंच्या हस्ते बुद्धवंदना देऊन गौतम बुद्धांची व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम व लहान मुलांचे संस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करणात आले होते. डॉ. बाबासाहेबांच्या जीवनावर भाषणे व गाण्यांचे आयोजन होते. रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांचे व बक्षीस समारंभ वितरण करण्यात आले. नंतर करमणुकीचा कार्यक्रम भीमगीतांचा ऑर्केस्ट्रा सर्वांचे मनोरंजन करून संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून मा.आमदार पंडितशेठ पाटील, चित्रलेखा पाटील, चित्रा पाटील, पोयनाडच्या सरपंच शकुंतला काकडे, माजी सरपंच भूषण चवरकर, जनार्दन म्हात्रे, डॉ. मोनाली चवरकर, अर्चना चवरकर, अजित चवरकर व तंटामुक्ती अध्यक्ष सुधीर चवरकर व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच अलिबाग तालुक्यातील बौद्धजन पंचायत समिती गट क्रमांक १२ पोयनाडचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
