वार्ताहर
नागोठणे : येथील रुख्मिणी केशव सावंत (वय ९२) यांचे वुध्दापकाळाने निधन झाले. गुरुवार, दि. १८ एप्रिल रोजी रुख्मिणी सावंत यांचे निधन झाले. रुख्मिणी सावंत यांच्या पश्चात मुलगी शारदा उत्तम सगणे, मुलगा महादेव सावंत, सुन रेखा महादेव सावंत, नातु मोरेश्वर सगणे, मधुकर सगणे, रुपेश सावंत, सिद्धांत सावंत, नात माधुरी आकाश तायडे, प्रियंका सावंत, नात सून प्रियंका मोरेश्वर सगणे, सावंत कुटुंब असा मोठा परिवार असून त्यांच्या निधनाने समस्त सावंत व सगणे परिवारावर दुःखाचे सावट पसरले आहे.
