• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

दारू पिऊन रेल्वे पुलावरून तोल गेल्याने तरुणाचा मृत्यू

ByEditor

Apr 28, 2024

विश्वास निकम
कोलाड :
मुंबई-गोवा हायवेवरील कोलाड रेल्वे ब्रिजवरुन दारू पिऊन तोल गेल्याने ब्रिजच्या खाली पडून तरुणाचा दुर्दैवी अंत झाला असल्याची घटना घडली आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, शनिवार, दि. २७/४/२०२४ रोजी २.५३ वा. संत रोहिदास नगर कोलाड येथील अभिषेक रविंद्र जानवरकर (वय ३०) हा कोकण रेल्वे ब्रिजवर दारू प्यायला असता त्याचा दारूच्या नशेत तोल जाऊन तो खाली पडून ब्रिजच्या खाली असलेल्या खडी व दगडावर आपटून गंभीर स्वरूपाची दुखापत होऊन मयत झाला असुन या घटनेचा अधिक तपास कोलाड पोलीस ठाण्याचे पोहवा एस. जे. मोरे हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!