माणगाव तालुका चिटणीस रमेश मोरेंचा शिवसेनेत प्रवेश
सलीम शेख
माणगाव : दक्षिण रायगड जिल्ह्यातील युवा नेतृत्व, शेकाप माणगांव तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी शेकापला रामराम ठोकत आ. भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २८ एप्रिल रोजी माणगांव येथे पत्रकार परिषद घेत शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केल्याची माहिती दिली. यावेळी आ भरत गोगावले, शिवसेना प्रवक्ते ॲड. राजीव साबळे, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, संपर्क प्रमुख अरुण चाळके, तालुका प्रमुख ॲड. महेंद्र मानकर, युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, नगरसेवक कपिल गायकवाड, शहरप्रमुख सुनिल पवार, मा. सभापती सुजित शिंदे, मा. सभापती रामभाऊ म्हसकर, विरेश येरुणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी आ. भरत गोगावले म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास कामांवर प्रभावित होऊन रमेश मोरे यांनी प्रवेश केला आहे. रमेश मोरे यांना विकासकामे करण्यात कोणत्याही प्रकारचा विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही. त्यांचा शिवसेना पक्षात योग्य तो सन्मान करण्यात येईल आणि त्यांना मानाचे पद देण्यात येईल. रमेश मोरे यांच्या बरोबर मोर्बा जिल्हा परिषद मतदारसंघातील बहुतेक सरपंच, उपसरपंच आणि कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे महायुती अधिक बळकट झाली आहे. रमेश मोरे हे कुणबी समाजाचे युवा नेतृत्व असून त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. प्रत्येक खेडोपाडी शासनाच्या योजना पोहचविण्यात त्यांनी यश मिळविले आहे. त्यामुळे त्यांचा पक्ष प्रवेश हा लोकसभा उमेदवार खा. सुनील तटकरे यांच्या विजयाची नांदी ठरणार आहे.
यावेळी रमेश मोरे म्हणाले की, माणगांव तालुक्यात शिवसेना पक्ष प्रामुख्याने विकासाची कामे करीत असून आ. भरत गोगावले हे जात, पात आणि पक्ष न पाहता विकासकामे करीत आहेत. त्यांच्या कामावर प्रभावित होऊन मी पक्ष प्रवेश केला आहे. माझ्या मोर्बा मतदारसंघात आ. भरत गोगावले यांनी सुमारे २ कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. या विकास कामांवर प्रभावित होऊन सोमवार, दि. २९ एप्रिल रोजी कुणबी भवन येथे आ. भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश करणार आहे, अशी माहिती दिली.