प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीतील दोन टप्प्यातील मतदान पार पडले असून उर्वरित टप्प्यातील मतदान बाकी आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर हे निरीक्षक म्हणून सोमवार, २९ एप्रिल रोजी रायगड लोकसभेचा दौरा करणार आहेत.
या दौऱ्यात आ. दरेकर यांची सोमवारी सकाळी ११ वाजता अलिबाग विधानसभा कोअर कमिटी, निवडणुक संचलन आणि आघाडी मोर्चा प्रकोष्ठसह सेल यांचे विधानसभा अध्यक्ष यांच्यासोबत बैठक होणार आहे. तर दुपारी १२ वाजता महायुती समन्वयक बैठक, दुपारी ३ वाजता माणगाव विधानसभा कोअर कमिटी, निवडणुक संचलन आणि आघाडी मोर्चा प्रकोष्ठ व सेल यांचे विधानसभा अध्यक्ष यांच्यासोबत बैठक, दुपारी ४ वाजता महायुती समन्वयक बैठक, सायं. ७ वाजता पेण विधानसभा येथील कामत हॅाटेल येथे कोअर कमिटी, निवडणुक निरिक्षक, आघाडी मोर्चा प्रकोष्ठ व सेल यांचे विधानसभा अध्यक्ष यांच्यासोबत बैठक आणि रात्री ८ वाजता रायगड जिल्हा व पेण विधानसभेतील महायुतीच्या समन्वयकांची बैठक होणार आहे.
याप्रसंगी मंत्री आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी, आ. रवी पाटील, आ. अनिकेत तटकरे, भाजपा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्यासह भाजपा, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआयचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आ. दरेकर यांचे जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.