विश्वास निकम
कोलाड : ३२ रायगड-रत्नागिरी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते हे विक्रमी मतांनी विजय होण्यासाठी रोहा तालुक्यातील कोलाड आंबेवाडी येथील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते कोलाड आंबेवाडी विभागात गावागावात जाऊन मतदार यांची थेट भेट घेत प्रचारात आघाडी घेत आहेत. रोहा तालुक्यांतून तसेच आंबेवाडी खांब जिल्हा परिषद गटातून लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांना मतदारांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. एक संयमी, अभ्यासू व शांत स्वभावाचे नेतृत्व व एकही भ्रष्टाचाराचा आरोप नसलेला कणखर उमेदवार म्हणजे अनंत गीते म्हणून त्यांची ख्याती असून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शेकाप, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेससह महाविकास आघाडीतील सामजिक संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे गावागावात जाऊन दौरे करीत असून मतदारांजवळ संपर्क करीत उमेदवार गिते यांची ताकद आधिक बळकट करत असताना दिसत आहेत.

राष्ट्रवादी अजित पवार गट, बीजेपी,शिवसेना शिंदे गट,आदी महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील तटकरे यांना पराभूत करण्यासाठी भयानक उष्णतेची लाट आहे. तरी देखील त्याची तमा न बाळगता गद्दारी विरुद्धची हि लढाई जिंकण्यासाठी तसेच देशाचे संविधान वाचविण्यासाठी येथील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या विजयासाठी यावेळी मतदारांशी गावोगावी प्रचार करत मतदार तसेच आबालवृद्ध यांची भेट घेत गद्दारी विरुद्ध आवाज उठवून आणि आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना शंभर टक्के मतदान करून निवडून देऊन लोकसभेत पाठविण्यासाठी एकटवले आहेत. रायगडच्या राजधानीत नावीन्यपूर्ण विजय प्राप्त करण्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थीती दर्शवित प्रचारात आघाडी घेताना दिसत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महायुतीकडून पुन्हा पंतप्रधान करायचे आहे, असे सांगून लोकांची दिशाभूल करून संविधान बदलण्याचा मोठा डाव असल्याचं बोलले जात आहे. हे बहुजन मतदारराजा यांना चांगलेच माहित आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते शरदचंद्र पवार, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, शेकापचे जयंत पाटील, काँगेस तसेच महविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते यांचे नेतृत्व खंबीर आहे. रायगड जिल्ह्यासह कोकणात महाविकास आघाडीच्या प्रचारसभा घेतल्याने वातावरण आघाडीचे झाले आहे. पदाधिकारी व कार्यकर्ते हे प्रचारासाठी उतरले आहेत. एकत्र एकदिलाने काम करीत असल्याचे चित्र या निवडणुकीत सर्वत्र पाहावयास मिळत आहे. वाडी-वस्त्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद्र पवार, शेतकरी कामगार पक्ष, महाविकास आघाडीचे घटक पक्ष निवडणुक प्रचाराचे काम युद्ध पातळीवर करीत असून यावेळेस अनंत गीते यांचा प्रचंड मतांनी विजय सुनिश्चित असल्याचे प्रचारादरम्यान शेकापचे नेते शिवराम महाबळे आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक चंद्रकांत लोखंडे यांनी व्यक्त केले आहे.