• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आज लाखो मतदार बजावणार मतदानाचा हक्क

ByEditor

May 7, 2024

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी प्रशासन सज्ज

मिलिंद माने
महाड :
आज दिनांक ७ मे रोजी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी महाड पोलादपूर तालुक्यातील शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. सोमवारी दुपारनंतर २७६ गावांमध्ये ४ हजार कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्राचा ताबा घेतला आहे.

आज २०२४ ची महाड पोलादपूर ३२ रायगड मतदार संघात लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. महाड तालुक्यात १८८ गाव असून पोलादपूर तालुक्यात ८८ गावे आहेत. महाड तालुक्यात २१३ तर पोलादपूर तालुक्यातील ६७ मतदान केंद्र आहेत. महाड तालुक्यात १ लाख ५५ हजार १४२ मतदार संख्या असून पोलादपूर तालुक्यात ४१ हजार ३४९ मतदार आहेत. दोन्ही तालुक्यासाठी ४ हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात अली आहे. मतदान केंद्रावर कर्मचारी तसेच ईव्हीएम मशीन ने आण करण्यासाठी ४३ एसटी बसेस, १८ मिनी बस, ११० खासगी जीप आणि ५ शासकीय वाहने अशी एकूण १७६ वाहने तैनात करण्यात आली आहेत. त्याचबरोबर एखाद्या केंद्रावर इव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला तर महाड पोलादपूर आणि माणगाव या तीन मतदान केंद्रासाठी अतिरिक्त १२७ ईव्हीएम मशीन तैनात ठेवण्यात आल्या आहेत.

महाड मतदान केंद्र हा संवेदनशील असल्यामुळे या ठिकाणी पोलीस सुरक्षा देखील कडक ठेवण्यात आली असून प्रत्येक केंद्रावर २ पोलीस आणि एक होमगार्ड तैनात ठेवण्यात आला आहे. या दोन्ही तालुक्यासाठी बाहेरून अतिरिक्त २०० होमगार्ड आणि २५८ पोलीस कर्मचारी मागवण्यात आले आहेत. स्थानिक पोलिसांसह २३३ होमगार्ड आणि ३१८ पोलीस कर्मचारी महाड आणि पोलादपूर तालुक्याच्या २८० मतदान केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!