• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

तीव्र उष्णतेमुळे मतदानासाठी जाणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

ByEditor

May 7, 2024

मिलिंद माने
महाड :
तीव्र उष्णतेमुळे मतदानासाठी बाहेर पडलेल्या व्यक्तीचा चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटना महाड तालुक्यातील किंजळोली दाभेकर कोंड येथे सकाळी नऊ वाजता घडली.

उष्णतेचा पारा सकाळी नऊनंतर 43 अंशावर जात असल्याने तीव्र उष्णतेचा फटका बसू नये यासाठी सकाळीच मतदान केंद्रावर जाण्यासाठी घरातून निघालेल्या किंजळोली दाभेकर कोंड येथील प्रकाश चीनकटे यांचा चक्कर येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. महाड तालुक्यातील किंजळोली दाभेकर कोंड येथील प्रकाश चिनकटे हे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पायी जात असताना मतदान केंद्रापासून केवळ शंभर मीटर अंतरावर असताना प्रकाश चिनकटे यांना चक्कर आल्याने चक्कर येऊन ते रस्त्यावर कोसळले. यामध्ये त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडल्याने किंजळोली दाभेकर कोंड येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!