• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पोलादपूर तालुक्यातील महाळुंगे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडले मोठे झाड

ByEditor

Jul 3, 2023

देवेंद्र दरेकर
पोलादपूर :
तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी बरसू लागल्या आहेत. मात्र पावसाचा जोर वाढताच तालुक्यात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या व झाडे कोसळण्याच्या घटना घडत आहेत.

सोमवारी सकाळी पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक येथे वरदायनी मंदिराच्या बाजूला महाळुंगे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भलेमोठे झाड पडले आहे. सुदैवाने यावेळी रस्त्यावर कोणीही नसल्याने मोठा अपघात टळला आहे. झाड पडल्यानंतर काही काळा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. मात्र गावातील स्थानिक तरुण विकास नलावडे व ग्रामस्थांनी कटर मशीन आणून तातडीने झाड कापायला सुरुवात केली व जवळपास चार ते पाच तासानंतर झाड कापून झाल्यानंतर हा रस्ता मोकळा करण्यात आला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!