• Sat. Jun 28th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

घोणसे घाटात सिमेंट ट्रकला अपघात; ट्रकचे आणि मालाचे प्रचंड नुकसान

ByEditor

May 11, 2024

वैभव कळस
म्हसळा :
अपघातग्रस्त घोणसे घाटातून सिमेंट घेऊन नागोठणेकडून म्हसळ्याकडे येणाऱ्या ट्रकला आज सकाळी १० वाजता भीषण अपघात झाला. ट्रक क्र. एमएच ०६ बीडी १२१७ हा भरधाव असल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच्या एका मोरीजवळ डोंगरावर आदळल्याने ट्रकचे आणि ट्रकमधील सिमेंटचे भयंकर नुकसान झाले. सदर ट्रक नागोठणेकडून म्हसळ्याकडे येत असताना घोणसे घाटातील केळेवाडी या परिसरांत तीव्र उतार आणि शिघ्र वळणावर चालकाचे भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.

अपघातात ट्रक आणि आतील मालाचे भयंकर नुकसान झाले. सदर अपघात आज शुक्रवार दि १० रोजी सकाळी १० वा झाला. पोलीस कर्मचारी नवीन असल्यामुळे अपघाताची नोंद होण्यास विलंब होत असल्याचे प्रभारी अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांनी सांगितले. सिमेंट कंपनीच्या ट्रान्सपोर्ट मॅनेजरची अपघाताची नोंद होऊ नये अशी पोलिसांना विनंती होती. तर हा घाट राष्ट्रीय महामार्ग एफ ७५३ या मार्गावर येत असल्याने घाटातील या ४ ते ५ किमीचा मार्ग तांत्रिकदृष्ट्या सदोष असल्याने प्रत्येक अपघाताची नोंद आणि चौकशी व्हावी अशी मागणी या भागातील सर्व राजकीय,सामाजिक संस्थानी केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!