• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण मतदार संघातील मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

ByEditor

May 12, 2024

३४४ मतदान केंद्रापैकी एकही एकही मतदान केंद्र संवेदनशील नाही

विठ्ठल ममताबादे
उरण :
चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी उरण विधानसभा मतदार संघातील संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून, या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मावळ लोकसभा मतदार संघातील १९० – उरण विधानसभा मतदार संघात संपूर्ण उरण तालुक्यातील ४ जिल्हा परिषद गट व उरण नगरपरिषद तर पनवेल तालुक्यातील गव्हाण व वडघर २ जिल्हा परिषद गट आणि खालापूर तालुक्यातील चौक आणि वासंबे २ जिल्हा परिषद गट आणि एक नगरपरिषद क्षेत्रात एकूण ३४४ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत.

उरण विधानसभा मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर ४ मतदान अधिकारी, १ शिपाई अशा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, प्रत्येक मतदान केंद्रावर एका पोलिस कर्मचाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. तसेच ३३ – मावळ लोकसभा मतदार संघातील १९० – उरण विधानसभा मतदार संघातील एकूण ३४४ मतदान केंद्रापैकी एकही मतदान केंद्र संवेदनशील नसून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नवीमुंबई पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, पनवेलचे उपायुक्त विवेक पानसरे यांच्या आधिपत्त्याखाली उरण विधासभा मतदार संघातील संबंधित पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील पोलिस अधिकारी त्यांच्या पोलिस कर्मचाऱ्यांसह ताफ्याची गस्त सज्ज ठेवण्यात आली आहे.

त्यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत होईल. असा आशावाद १९०-उरण विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जनार्दन कासार व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उरणचे तहसिलदार डॉ. उद्धव कदम यांनी व्यक्त केला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!