अब्दुल सोगावकर
सोगाव : अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांनी आपले सहकारी आशिष भट व सामाजिक कार्यकर्ते प्रतिक खारकर यांच्यासह महाराष्ट्र भूषण, ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना १४ मे रोजी सकाळी त्यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आशीर्वाद घेतले. यावेळी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील तसेच श्री सदस्य यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.