घन:श्याम कडू
उरण : उरणमधील २५ वर्षीय महिलेच्या बलात्काराच्या खटल्याची केस पनवेल सत्र न्यायालयात सुरु आहे. आता या केसला अतिशय नाट्यमय वळण लागले असून यातून किळसवाणे सत्य समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २५ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान घडली आहे. जवळपास महिनाभरापूर्वी उरण पोलिसांनी २५ वर्षीय महिलेच्या माहितीवरून एका ३५ वर्षीय तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.
उल्लेखनीय बाब म्हणजे महिलेच्या पतीला तिच्या अफेअरबद्दल कळल्यानंतर तिने हा गुन्हा दाखल केल्याचे सूत्रांमार्फत समजते. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करून कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टात सुनावणीदरम्यान, पुराव्याचा भाग म्हणून महिलेने दोघांचा एक व्हिडिओ सादर केला. व्हिडिओ पाहून कोर्टाने व्हिडिओच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न उपस्थित केला. हा व्हिडिओ तिसऱ्याच व्यक्तीने शूट केल्याचे कोर्टाच्या लक्षात आले.
त्यानंतर ६ वर्षांच्या चिमुकल्याला त्याच्या आईनेच, तिचे आणि तिच्या बॉयफ्रेंडचे आक्षेपार्ह अवस्थेतील अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सांगितल्याची धक्कादायक कबुली महिलेने दिली आहे. तिच्या मुलानेच आई व तिच्या बॉयफ्रेंडच्या सांगण्यावरून ते रेकॉर्डिंग केल्याची संतापजनक बाब समोर आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर न्यायाधीशांमार्फत आई आणि तिच्या प्रियकराविरोधात एफआयआर नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले.
न्यायालयाच्या सूचनेनंतर उरण पोलिसांनी महिलेला तिच्या बॉयफ्रेंडसह अटक केली आहे. मात्र या विचित्र तितक्याच धक्कादायक वृताने उरणमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जन्मदाती आई आपल्या ६ वर्षीय चिमुकल्याकडुन इतके घाणेरडे तितकेच किळसवाणे कृत्य करून कसे घेऊन शकते? याबाबत अनेकांनी सामाजिक स्वास्थ बिघडल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.