• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठणे पत्रकार संघाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

ByEditor

Jul 3, 2023

किरण लाड
नागोठणे :
नागोठणे पत्रकार संघाच्यावतीने नागोठणेमधील विविध शाळांमध्ये इ.१० व १२वीच्या शालान्त परीक्षेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

कोएसोच्या गु. रा. अग्रवाल विद्यामंदिर, भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस. डी. परमार इंग्लिश मिडीयम स्कुल, उर्दु हायस्कूल, होली एंजल स्कुल नागोठणे तसेच जिंदाल स्कुल सुकेली या विविध शाळेतील इयत्ता 10 वी व 12 वीमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नागोठणे पत्रकार संघाच्यावतीने शिवगणेश हॅाल येथे दि. २ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतीय एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन, माजी राजिप सदस्य किशोर जैन, नागोठणे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पोमण, हेड कॉन्स्टेबल विनोद पाटील हे प्रमुख अतिथी तर संघाचे अध्यक्ष उदय भिसे, उपाध्यक्ष किरण लाड, सचिव महेंद्र माने, पत्रकार संघाचे सल्लागार सुधाकर पत्की, समाजसेवक लक्ष्मण पत्की आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देवुन सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी राजिप सदस्य किशोर जैन व स. पो. निरीक्षक संदीप पोमण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या शैक्षणिक कार्यक्रमाची प्रस्तावना संघाचे अध्यक्ष उदय भिसे यांनी केली तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष किरण लाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण म्हात्रे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार संघाचे रोशन पत्की, मनोहर सकपाळ, संदेश गायकर, अर्चित भिसे, संकल्प माने आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!