• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सेफ्टी लॉकर तोडून दागिने व रोख रक्कम लंपास, माणगावमधील घटना

ByEditor

May 25, 2024

सलीम शेख
माणगाव :
शहरात चोरीचे सत्र सुरूच आहे. बंद घरातील सेफ्टी लॉकर तोडून दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना घडली आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २३ मे रोजी दु. ३ वा. ते २४ मे रोजी ७ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी योगेश जाधव, रा. रुम नं. २०२, दत्त छाया बिल्डिंग, दत्तनगर माणगाव यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचा लॉक कोणत्या तरी हत्याराने तोडून बेडरूममधील कपाटाच्या सेफ्टी लॉकरमधील पिशवीत ठेवलेले दागिने व रोख रक्कम असा एकूण ५७,७०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. या घटनेची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!