• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

चिटफंड प्रकरणी माणगाव पोलिसांकडून आवाहन

ByEditor

May 25, 2024

सलीम शेख
माणगाव :
माणगाव पोलीस ठाणे येथे आरोपी १) संदेश सुरेश कवडे, रा. वंदना अपार्टमेंट, कचेरी रोड, माणगाव, २) मनोज सदानंद तेटगुरे, रा. साळवे, ता. माणगाव, ३) देवेंद्र पांडुरंग गायकवाड, रा. निजामपुर ४) संजय बाळकृष्ण गायकवाड, रा. कचेरी रोड, अपना मेडीकल वरती, ३ रा मजला, माणगाव यांचेवर गुन्हा नोंद क्रमांक ११५/२०२४, भा.दं.वि.सं. कलम ४२०, ३४ अन्वये दि. २४ एप्रिल २०२४ रोजी गुन्हा दाखल झालेला आहे. दाखल गुन्ह्याच्या आत्तापर्यंतच्या झालेल्या तपासामध्ये गुन्ह्यातील आरोपींनी चौघाजणांच्या भागीदारीत “आपला ॲडव्हायझरी” व “ट्रस्ट इंटरप्रायझेस” नावाने कंपनी स्थापन करुन बिझनेस ऑफीस सुरु केले असल्याचे लोकांना सांगून, त्या बिझनेसमध्ये लोकांना पैसे गुंतवणूक करण्यास सांगून, लोकांनी केलेल्या गुंतवणूकीची रक्कम व्यवसायात टाकून त्या व्यवसायातील मिळणाऱ्या नफ्यातून गुंतवणूकदारांना नफ्याची ६ ते ७ टक्के रक्कम प्रत्येक महिन्याला देऊ असे सांगितले व लोकांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपींकडे त्यांच्या सांगण्यावरुन गुंतवणूक करणाऱ्या लोकांना रक्कम परत देण्यास टाळाटाळ करुन आरोपींनी अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केलेली असल्याचे निषन्न होत आहे. तरी सदरच्या आरोपींकडून अशाप्रकारे फसवणूक झालेल्या लोकांनी माणगाव पोलीस ठाणे येथे येऊन त्याबाबत तक्रार दाखल करावी असे आवाहन माणगाव पोलीस ठाणे यांचेकडून करण्यात आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!