• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा श्रीवर्धन तालुक्याचा निकाल ९६.२९ टक्के

ByEditor

May 27, 2024

११ शाळांचा १०० टक्के निकाल

अभय पाटील
बोर्ली पंचतन :
मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला असून यामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील शाळांचा निकाल 96.29 टक्के इतका लागला असून 22 माध्यमिक शाळांपैकी 11 शाळांचा निकाल हा 100 टक्के लागला आहे.

श्रीवर्धन तालुक्यातुन एकूण 893 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील 858 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा निकाल 96.29 इतका लागला. तसेच श्री मोहनलाल सोनी विद्यालय, बोर्ली पंचतन विद्यालयाचा एस्.एस्.सी. मार्च 2024 परीक्षेचा एकूण निकाल 91.34% इतका लागला आहे. विद्यालयातून प्रथम येण्याचा मान विधी परशुराम बिराडी या विद्यार्थिनीने पटकाविला असून तिला 92.60 टक्के इतके गुण मिळाले आहेत. श्री मोहनलाल सोनी विद्यालयातून परीक्षेस 104 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील 95 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे – प्रथम क्रमांक विधी परशुराम बिराडी – 92.60, द्वितीय क्रमांक गार्गी सुबोध गायकर – 87.60%, तृतीय क्रमांक आदीत किरण कदम – 86.80% यांनी पटकाविला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!