न्यू इंग्लिश स्कूलची सृष्टी वालवटकर ९२.२० टक्के गुण मिळवून प्रथम तर ओम कुलकर्णी ९२ टक्क्यांनी द्वितीय
अंजुमनचा अब्दुला जळगावकर ९२.६० टक्क्याने प्रथम
वैभव कळस
म्हसळा : मार्च २०२४ मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेचा निकाल आज २७ मे २०२४ रोजी ऑनलाईन लागला. तालुक्याचा एकूण निकाल ९८ टक्के लागला असून न्यू इंग्लिश स्कूलचा निकाल १००% लागला आहे. अंजुमन हायस्कूलचा निकाल ९८% लागला.
न्यू इंग्लिश स्कूलची सृष्टी रुपेश वालवटकर हिने ९२.२० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला. ओम प्रदिप कुलकर्णी ९२% गुण मिळवून द्वितीय तर स्वयंम सचिन शेट्ये याला ८८% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळाला. अंजुमन हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज म्हसळाचा अब्दुल्लाह इस्माईल जळगावकर ९२.६०% गुण मिळवून विद्यालयात प्रथम आला. तर जुनेद लांगे ९१.८०% गुणांनी द्वितीय आणि अहमद रजा हुसैन याने ९०.६०% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. मागासवर्गीयात न्यू इंग्लिश स्कूलची सृष्टी वालवटकर हिने तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला.
स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन नासिर मिठागरे, हलका कमिटी अध्यक्ष फझल हळदे, गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड, गटविकास अधिकारी जाधव, तहसीलदार समीर घारे, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, पोलीस निरीक्षक पवन चौधरी, अंजुमन हायस्कुलचे प्राचार्य अ. रहमान घराडे, नगराध्यक्ष संजय कर्णिक, उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, मतीन फणसे आदि मान्यवरांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.