गौतम जाधव
इंदापूर : तळा तालुक्यातील सोनसडे गावातील कु. श्रावस्ती प्रशांत माळी तसेच धानिता काशिराम गव्हाणे उर्फ प्रेरणा प्रशांत माळी या मायलेकी एकाच वेळी दहावी बोर्डाच्या परीक्षेला बसल्या असता त्या दोघीही चांगल्या गुणांनी पास झाल्या आहेत.
जवाहर नवोदय विद्यालय निजामपूर येथे शिकणारी श्रावस्ती प्रशांत माळी ही सीबीएसई बोर्डामध्ये ६५% टक्के गुण मिळवून पास झाली आहे. तर धानिता काशिराम गव्हाणे उर्फ प्रेरणा प्रशांत माळी ही माध्यमिक शालांत परीक्षेत ५५.%८० टक्के गुण मिळवून पास झाली आहे. कु. श्रावस्ती आणि तीची आई धानिता या दोघींचे तळा तालुक्यात तसेच सोनसडे ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रमंडळीकडून अभिनंदन होत आहे. शिक्षणाला वयाची अट नसते हा आदर्श या मायलेकींनी समाजासमोर ठेवला आहे.