• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह 125 जणांवर गुन्हा दाखल

ByEditor

May 30, 2024

मिलिंद माने
महाड :
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह 125 जणांनी एकत्र जमून रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी राज्यातील लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिते संदर्भात जारी केलेल्या 149 प्रमाणे दिलेल्या नोटिशीचा भंग केला म्हणून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाड येथील क्रांती स्तंभाजवळ मनस्मृतीचे दहन करण्याच्या उद्देशाने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी रायगड जिल्हाधिकारी यांनी निवडणूक काळात बजावलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात पोलीस नायक विक्रम हनुमंत धोत्रे यांच्यावतीने फिर्याद दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, महेश साळवी (रा. कळवा), संजय कदम (रा. मुंब्रा), दीपक विश्वकर्मा (रा. मुंब्रा), करण गायकवाड (रा. रेतीबंदर ठाणे), यश चौधरी (रा. मुंब्रा, ठाणे), रंजीत विश्वकर्मा (रा. मुंब्रा ठाणे), दीपक राजभर (रा. कळवा-ठाणे), सुजाता घाग (रा. ठाणे), रत्ना वैदही (रा. ठाणे), मयूर चांदूरकर (रा. रोहिदास नगर, महाड), मिलिंद टिपणीस (रा. गवळी आळी, महाड), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट महाड तालुका अध्यक्ष मुदस्सीर अहमद पटेल (रा. वहूर महाड), अभिजीत पवार (रा. ठाणे), रोहित आपटे (रा. ठाणे), सुहास देसाई (रा. ठाणे), सीमा सुरवसे, रेश्मा म्हात्रे, ज्योतीताई शास्त्री, सदानंद येवले (रा. तळा), पराग वडके (रा. महाड), काँग्रेस पक्ष महाड तालुका अध्यक्ष प्रदीप मेहता, सचिन सोनवणे (रा. आसनपूई महाड), पंकज मोहोळ (रा. ठाणे) यांच्यासह 100 ते 125 समर्थकांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

महाड शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिता कलम 188 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (१) (३) 135 प्रमाणे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह 125 जणांवर गुन्हा दाखल केला असून याचा तपास पोलीस निरीक्षक तडवी करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!