• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

तेलंगणा राज्यातील आरोपींना माणगाव पोलिसांनी केले गजाआड

ByEditor

May 30, 2024

सलीम शेख
माणगाव :
तेलंगणा राज्यातील पहाडीशरीफ पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी आरोपींना माणगाव पोलिसांनी अटक केली आहे. पहाडीशरीफ पोलीस ठाणे कॉ.गु .रजि.नं. २८२/२०२४ भा.द.वि.स.कलम ३९२ प्रमाणे हा गुन्हा दि. २४ मे २०२४ रोजी ५.५० वाजण्याच्या सुमारास मौजे मनकलगाव ता. महेश्वरम जि. रचिकोंडा राज्य तेलंगणा येथे घडला आहे. सदर गुन्हयातील फिर्यादी गड्डमेदी कल्पना महेंदर हे मॉर्निंग वॉक करिता गेले असता त्यांचे गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून चोरून नेली आहे. असे दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील आरोपी धनला बाबू बालाजी गायकवाड (रा. मुबारक नगर, निजामाबाद मूळ रा.खारपूर ता. देगलूर जि.नांदेड), समशेर सिंग चतुरसिंग टाक (रा. बिचुकुंडा निझामाबाद राज्य तेलंगणा) हे सदर गुन्हा घडल्यापासून आपले अस्तित्व लपवून इतर राज्यामध्ये फिरत असून त्यांचेवर तेलंगणा राज्यात मालमत्तेविरुद्धचे (चोरी, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी) एकूण ३७ गुन्हे दाखल करण्यात आले असल्याबाबत संबंधित पोलीस ठाणेकडून माहिती प्राप्त झाली होती.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली माणगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचे नेतृत्वाखाली पोलीस ठाणे स्तरावर पथके तयार करण्यात आली होती. त्याप्रमाणे प्राप्त माहितीच्या अनुषंगाने हद्दीत गस्त वाढविण्यात आली. त्यावरून नमूद गंभीर गुन्ह्यातील आरोपी हे माणगाव रेल्वे स्टेशन येथे असल्याची बातमी गोपनीय बातमीदारामार्फत मिळाल्याने सदर ठिकाणी तात्काळ तपास पथकांनी सापळा रचून आरोपित यांचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून त्यांना बुधवार दि. २९ मे २०२४ रोजी ताब्यात घेतले आहे. त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता संबंधित आरोपित यांनी चोरी, घरफोडी, जबरी चोरी असे अनेक गुन्हे दाखल असले बाबतची कबुली दिल्याने सदर आरोपित यांना पहाडीशरीफ पोलीस ठाणे जि. रचिकोंडा, राज्य तेलंगणा येथील तपासिक अधिकारी यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे व उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांचे अधिपत्याखाली माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील, पोलीस उपनिरीक्षक किर्तीकुमार गायकवाड, पोलीस हवालदार रावसाहेब कोळेकर, पोलीस शिपाई रामनाथ डोईफोडे, पोलीस शिपाई पवार यांनी पार पाडली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!