• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

एमसीए निमंत्रित क्रिकेट स्पर्धेसाठी रायगडच्या मुलींचा संघ संभाजीनगर येथे रवाना

ByEditor

Jun 2, 2024

क्रीडा प्रतिनिधी
रायगड :
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित मुलींच्या वरीष्ठ गटाच्या एकदिवस क्रिकेट स्पर्धेसाठी आज रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ गटातील मुलींचा संघ संभाजीनगर येथे रवाना झाला आहे. संघाच्या कर्णधारपदी समिधा तांडेल हिची निवड करण्यात आली आहे.

संघामध्ये समिधा तांडेल (कर्णधार), समृद्धी कांबळे, अपर्णा गायकवाड, आमिषा बामणे, श्रुती देसाई, शुभांगी दास, अंजली गोडसे, अनुष्का वर्मा, प्रांजल चिपळूणकर, रुचिता नाचणकर, काजल साळुंके, श्रुती आदीत, श्रुष्ठी भोईर, वेदश्री शेळके या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. वरिष्ठ गटाच्या मुलींच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून विनय पाटील तर संघ व्यवस्थापक म्हणून शाम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुलींच्या संघाला रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. भविष्यात रायगड जिल्ह्यात मुलींच्या क्रिकेटसाठी नियोजनबद्ध आखणी करून भरपूर स्पर्धा आणि कॅम्पचे आयोजन जिल्हा क्रिकेट असोसिएशन करणार असल्याचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!