अनंत नारंगीकर
उरण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, उरण तालुकाध्यक्ष ॲड. सत्यवान भगत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठीजुई येथील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून चाणजे विभाग अध्यक्षपदी पराग म्हात्रे, नविन शेवा गाव अध्यक्षपदी भालचंद्र म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आल्या. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.