• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ज्येष्ठ पत्रकार विजय मोकल यांचे धाकटे बंधू विकास मोकल यांचे आकस्मिक निधन

ByEditor

Jun 5, 2024

विनायक पाटील
पेण :
ज्येष्ठ पत्रकार विजय मोकल यांचे धाकटे बंधू विकास मोकल यांचे आकस्मिक निधन झाल्याने मुंबईसह पेण तालुक्यात व बोरी गावात दुःखाचे सावट पसरले आहे. त्यांची अंत्ययात्रा बोरी येथील घरून काढण्यात आली. त्यांच्यावर बोरी येथील स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले.

विकास मोकल यांना लहानपणापासून व्यवसायाची आवड होती. प्रथम डोंगरी, मुंबई येथील चिनवाला बिल्डींग येथे चहाची छोटी टपरी सुरू केली. त्यानंतर चूनाभट्टी येथे स्थलांतरित झाल्यानंतर तेथेही छोट्या जागेत भाड्याने चहा, नाश्त्याचे छोटे हॉटेल सुरू केले. काही काळाने जोगानी इंडस्ट्रीयल येथे भाड्याने जागा घेऊन हॉटेल व्यवसाय सुरू केला. त्यानंतर तेथेच स्वतःच्या मालकीचे हॉटेल सुरू केले.

शांत व प्रेमळ स्वभावाने त्यांनी सर्वांची मने जिंकली होती. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुले, वडील, तीन भाऊ, दोन विवाहित बहिणी असा मोठा परिवार आहे. त्यांची दशक्रिया विधी गुरुवार, दि. 13 जून 2024 रोजी उद्धर, पाली येथे होणार असून उत्तरकार्य रविवार, दि. 16 जून 2024 रोजी बोरी येथील निवासस्थानी होणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!