• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

संपत्ती विकावी लागली तरी चालेल पण कार्ले आदिवासी वाडीचा विकास करणारच -प्रीत बाबेल

ByEditor

Jul 5, 2023

विद्यार्थ्यांना संगणक, शालोपयोगी वस्तू तर महिलांना साड्या वाटप

अमोल चांदोरकर
श्रीवर्धन :
श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले आदिवासी वाडी येथे दि. 5 जुलै रोजी पुणे येथील प्रसिध्द व्यवसायिक प्रीत बाबेल यांच्या वतीने विद्यार्थ्यांना संगणक तसेच शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच आदिवासी महिला वर्गासाठी साड्यांचे वाटप करण्यात आले.

श्रीवर्धन तालुक्यातील अनेक खेड्यापाड्यांचा विकास होत असताना मात्र आदिवासी वाडी कार्ले या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव अद्याप आहे हे प्रीत बाबेल यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने यावर मार्ग काढण्यासाठी पावले उचलली. मुलांना खाऊ वाटप करण्यापासून झालेली सुरुवात आज शालेय साहित्य, महिलांना साड्या वाटपापर्यंत पोहोचली. याच अनुषंगाने बोलत असताना बाबेल यांनी आदिवासी वाडी कार्ले येथील सर्व महिला, बांधव हे माझे आहेत आणि ह्या वाडीचा कायापालट येणाऱ्या काळात मी करणारच आणि त्यासाठी माझी संपूर्ण संपत्ती पणाला लागली तरी चालेल पण येथील युवकांना रोजगार, विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण, महिलांना काम असे विविध प्रकारच्या सेवासुविधा येणाऱ्या काळात येथे निर्माण करण्याचे आश्वासन प्रीत बाबेल यांनी दिले.

याप्रसंगी महमद मेमन यांनी आपले मतं व्यक्त करताना प्रीत बाबेल यांच्यावर स्तुतीसुमने उधळत त्यांचे आभार मानले तसेच ते करीत असलेल्या आदिवासी वाडीच्या विकासामध्ये येणाऱ्या काळात त्यांचाही खारीचा वाटा असणार असे मतं व्यक्त केले. या कार्यक्रमाला उपस्थित बाबेल यांचे जवळचे मित्र नंदकुमार पाटील यांनीही बाबेल करीत असलेल्या कार्याला प्रोत्साहन दिले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी आपली उपस्थिती दर्शविली. त्यामध्ये श्रीवर्धन नायब तहसीलदार भुर्के, अँड. जयदीप तांबुटकर, सपोनी प्रसाद ढेबे, विजय तोडणकर, कार्ले सरपंच, उपसरपंच, महादेव खेडेकर, सर्कल पाटील प्रामुख्याने या कार्यक्रमाची रूपरेषा ज्यांनी ठरविली ते पत्रकार श्रीकांत शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!