प्रतिनिधी
अलिबाग : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांना अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेतर्फे राष्ट्रीय आगरी पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले.
अखिल भारतीय आगरी समाजिक संस्थेचा सहावा वर्धापनदिन सोहळा शनिवारी (दि. १३) पेण येथील आगरी समाज सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात सुरेश पाटील यांना राष्ट्रीय आगरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. आगरी सामाजिक संस्थेने समाजातील वेगवेगळ्या क्षेञात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तीस सन्मानित करण्यात आले. शिक्षण, संगीत, व्यावसायिक, मेट्रो महिला चालक यांना पुरस्कार देण्यात आला. लोहमार्ग पोलिस आयुक्त रवींद्र शिसवे, आगरी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नारायणशेठ ठाकूर, नाशिकचे जि. प. सदस्य जनार्दन माळी, ज्ञानविकास संस्थेचे अध्यक्ष अँड. पी. सी. पाटील आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सहकार क्षेत्रातील अग्रगण्य आदर्श पतसंस्थेचे निर्मितीत मोलाचे योगदानाबद्दल सुरेश पाटील यांची राष्ट्रीय आगरी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सुरेश पाटील यांना यापूर्वी सहकार शताब्दीनिमित्त रायगड जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून विभागीय सहनिबंधक यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले होते.